BEST OFFERS

Tuesday, 31 October 2017

सई ताम्हणकरने स्वीकारला तिचा पहिला फिल्मफेर अवार्ड फॅमिली कट्टासाठी



नेसको आयटी पार्क येथे २७ ऑक्टोबर २०१७ रोजी जिओ फिल्मफेअर  अवॉर्ड्स २०१७  हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. विविध प्रकारचे परफॉर्मन्स हा सोहळ्याचा नेहमीचा प्लस पॉईंट असला तरी देखील, ह्या वेळेसचे रेडकार्पेट हि जोरदार होते. 

सई ताम्हणकरचा ब्लु गाऊन विथ डायमंड नेकलेस विशेष लक्षवेधी ठरला हे नक्कीच! या व्यतिरिक्त सईसाठी  फिल्मफेअरच हे तिसरं वर्ष विशेष ठरलं आहे! 

 ह्या वेळेस चा जिओ फिल्मफेअर  अवॉर्ड्स सई ताम्हणकर साठी नक्कीच विशेष होता. कारण जिओ फिल्मफेअर २०१७ मध्ये सईला  दोन चित्रपटांसाठी नामांकन होती - उत्कृष्ट अभिनेत्री, वजनदार आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, फॅमिली कट्टा!  

सई ताम्हणकरला फॅमिली कट्टासाठी उत्कृष्ट सहाय्यकअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला . सईच्या सिनेमातील वाटचालीमधला हा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड आहे. फिल्मफेअरचे हे तिसरे वर्ष आहे आणि  त्यामुळे तिच्यासाठी हा विशेष होता. हा अवॉर्ड स्वीकारताना सई खूप भारावून गेली होती. ह्या बाबत सई म्हणाली, 'हो हा  माझा पहिला फिल्मफेर आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय. हा फिल्मफेर आणखी खास आहे कारण मला हा अवॉर्ड फॅमिली कट्टासाठी मिळाला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी अनेक पर्सनल कारणांसाठी खास होता, खूप जवळचा होता, आणि त्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळणं आणि ते हि पहिला फिल्मफेर मिळणं हे तर नक्कीच फार आनंददायी आहे. पण  मी ह्या सेलेब्रेशनवर जास्त वेळ रमणार नाहीये, पुढच्या कामासाठी लगेच तयार होणार आहे. इनफॅक्ट माझा डेली रुटीन सुरु  झालंय.'

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या फॅमिली कट्टा ह्या चित्रपटात सईने 'मंजू' नावाची भूमिका साकारली होती.  चित्रपटातला तिचा वावर अवघा काही मिनिटांचा असला तरी तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने कायम लक्षात राहिलं असा प्रभाव प्रेक्षकांवर नक्कीच पाडला होता. आणि या तिच्या भूमिकेसाठी  तिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.  

Crompton Launches New Range of Decorative Wall Lights Providing a Perfect Blend of Uniqueness & Aesthetics

December 16, 2024, Mumbai – Crompton Greaves Consumer Electricals Limited, renowned for its dedication to quality and innovative...