BEST OFFERS

Tuesday, 30 August 2016

महाराष्ट्राची लगोरी


महालगोरी 
 

लगोरी म्हंटलं कि सर्वानाच आपले बालपण आठवते. या खेळाशी प्रत्येकाचे काही ना काही नाते असतेच. लगोरी .. डिकोरी... लगूरी अशा अनेकविध नावानी या खेळाला ओळखले जाते. 
लगोरी हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही कारण याचे काही पौराणिक संदर्भ सुद्धा मिळतात. शिवाय  या खेळाला आता आंतरराष्ट्रीय मान्यता हि मिळाली आहे. 
 
पण आताच्या पिढीला या खेळाबद्दल फारशी माहिती नाही . म्हणूनच विस्मरणात जात असलेल्या या खेळाला आम्ही पुन्हा एकदा महालगोरी च्या निमित्ताने  सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत . या कार्यक्रमाचे आयोजन एशियन एंटरटेनमेंट चे श्री. सचिन साळुंखे आणि निमंत्रक शिवरत्न एंटरटेनमेंट चे  धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.  संकल्पना तेजपाल वाघ आणि व्यवस्थापन फ्रेमएलिमेंट्स यांच्या द्वारे केले जाणार आहे. सप्टेंबर २०१६  च्या अखेरीस अकलूज येथे हे सामने होणार आहेत. शिवाय झी टॉकीज वाहिनी वर या सामन्यांचे प्रसारण होणार आहे.
 
२८ ऑगस्ट २०१६ रोजी या क्रीडा मालिकेचे उदघाटन मा. श्री. राज ठाकरे साहेब यांच्या हस्ते वेस्टीन हॉटेल गोरेगाव पूर्व या ठिकाणी संपन्न झाले. 
 
महालगोरी चे वैशिष्ट्य असे आहे कि यामध्ये खेळ आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. आपले मराठी कलाकार यामध्ये भाग घेणार आहेत. आठ टीम्स आणि त्यांचे कॅप्टन अशी यांची विभागणी असेल. प्रत्येक टीम च नाव एका किल्ल्यावर आधारित असेल.  या टीम्स च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील किल्ल्याना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहोत. याच बरोबर विजेत्यांच्या बक्षिसाची रक्कम किल्ल्यांचे संवर्धन  करणाऱ्या NGO  ला देण्यात येईल. यामुळे आपल्या किल्ल्यांची साफसफाई आणि चांगली व्ययस्था ठेवणाऱ्या NGO ला मदत होईल आणि आम्हाला  महाराष्ट्राचे  वैभव जपण्याची संधी मिळेल. 

या प्रसंगी प्रसाद ओक आणि संजय नार्वेकर यांनी रंगमंचावर लगोरीचा खेळ खेळून सामन्याला सुरुवात केली .  
 
या क्रीडा मालिकेचे शीर्षक गीत संगीतकार रोहन - रोहन यांनी केले आहे . संजय जाधव , प्रसाद ओक , संजय नार्वेकर , अभिजित पानसे , सोनाली कुलकर्णी , स्मिता गोंदकर , हेमांगी कवी , केदार शिंदे , संग्राम साळवी , आदिनाथ कोठारे मनीषा केळकर , श्रुती मराठे  असे अनेक मान्यवर कलाकार खेळणार आहेत. आणि टीम्स ची नावे अनुक्रमे अशी असतील.

रांगडा रायगड 
सरखेळ सिन्धुदुर्ग 
अभेद्य अकलूज 
नरवीर सिंहगड 
पावन पन्हाळा 
सरदार शिवनेरी  
झुंजार राजगड 
बुलंद प्रतापगड  

Crompton Launches New Range of Decorative Wall Lights Providing a Perfect Blend of Uniqueness & Aesthetics

December 16, 2024, Mumbai – Crompton Greaves Consumer Electricals Limited, renowned for its dedication to quality and innovative...