मराठी सृष्टीतील लाडका दिग्दर्शक, संजय जाधव, यांनी सिनेमा प्रेमींना अभिनयासाठी आपली आवड शोधण्याची व आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची एक संधी योजली आहे व त्यानुसार एक मंच उपलब्ध करून दिला आहे.
‘ड्रीमिंग डिजिटल फिल्म इन्स्टिट्यूट’ या त्यांच्या नवीन उपक्रमात, फिल्म-मेकिंगमध्ये डिप्लोमा कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सुरुवात म्हणून, त्यांनी अभिनयावर एक मोफत कार्यशाळा करण्याचं योजलं आहे, ज्यात मर्यादित जागा असून ते २५ मार्च २०१८, रविवार, रोजी आयोजित केले जाईल.
या कार्यशाळेत आपल्याला सर्वोत्तम पाठिंबा देण्यासाठी, सिनेसृष्टीतील व्यावसायिकांकडून भाग घेतला जाईल.
इच्छुक व्यक्ती ड्रीमिंग डिजिटल फिल्म इन्स्टिट्यूट' मध्ये संपर्क साधू शकतात +९१-९८६७०३३३६६ किंवा ०२२-२९२७६५२७ क्रमांकावर.
त्यांचा ऑफिस चा पत्ता: ४०१, सिनर्जी बिझनेस पार्क, सहकार रोड, विरविनी इंडस्ट्रियल इस्टेट मागे, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३
संजय, तुम्हाला या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा.