BEST OFFERS

Saturday, 30 September 2017

संगीताचा एक अविस्मरणीय अनुभव ‘छंद प्रितीचा’


-चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न



सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला सुबोध भावेसुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णी अभिनित 'छंद प्रितीचाया आगामी मराठी चित्रपटाचे म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. या प्रसंगी 'छंद प्रितीचा'चित्रपटाचे निर्माते चंद्रकांत जाधवलेखक-दिग्दर्शक एन. रेळेकरअभिनेते सुबोध भावेअभिनेत्री नृत्यांगना सुवर्णा काळेअभिनेते हर्ष कुलकर्णीविकास समुद्रे,संगीतकार प्रविण कुंवर उपस्थित होते.

या सोहळ्याची सुरुवात विकास समुद्रे आणि जयवंत भालेकर यांच्या दमदार स्कीटने होत चित्रपटाचं पहिलं-वहिलं असं "आलं आभाळ भरून" हे रोमँटीक गाणं लाँच करण्यात आलं. तितक्यात टांग टांग टांग धित तांग धित तांग... चा आवाज कानावर पडला आणि सजग होऊन सगळ्यांचे कान टवकारले जाऊन "निस्ती दारावर टिचकी मारा..." या ठसकेबाज लावणीचा आस्वाद घेतला गेला. बेला शेंडे आणि वैशाली सामंत या दोन्ही नामवंत गायिकांच्या सुरेल स्वरातील  फटकेबाज सवाल-जवाबांनी मैफिलीला रंगत आली. त्यानंतर सुवर्णा काळेच्या मोहक अदांनी रंगलेल्या "नाही जायचं घरीवाजो पहाटेचे पाच..." या ठसकेबाज लावणीने मनमुराद डोलायला लावले.

प्रेमला पिक्चर्स निर्मित 'छंद प्रितीचाचित्रपटात एकूण आठ गाण्यांचा समावेश असून गीतकार एन. रेळेकर यांच्या लेखणीतून ती अवतरलेली आहेत. आजचा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक जावेद अली तसेच बेला शेंडेआदर्श शिंदेवैशाली सामंतकेतकी माटेगावकर यांसारख्या एकापेक्षा एक मातब्बर अशा सरस गायक-गायिकांच्या मधुर स्वरांनी नटलेल्या या चित्रपटातील गीतांना संगीतकार प्रविण कुंवर यांनी संगीतबद्ध केलेले आहे.

प्रेमला पिक्चर्स निर्मित 'छंद प्रितीचाचित्रपटाची निर्मिती निर्माते चंद्रकांत जाधव यांनी केलेली असून चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केलेले आहे.

दिलखेचक लावण्याठेका धरायला लावणारं संगीत आणि कान तृप्त करणारे गायक – गायिकांचे कर्णमधूर आवाज त्यात कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय तर सोंगाड्या सुंदरचे खळखळून हसवणारे मार्मिक विनोद यांनी नटलेली कलाकृतीछंद प्रितीचा’ येत्या 10 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Crompton Launches New Range of Decorative Wall Lights Providing a Perfect Blend of Uniqueness & Aesthetics

December 16, 2024, Mumbai – Crompton Greaves Consumer Electricals Limited, renowned for its dedication to quality and innovative...