BEST OFFERS

Friday, 15 September 2017

आता घुंगरांना मिळणार सुबोधच्या ढोलकीची साथ!



'हृदयांतर', 'तुला कळणार नाहीअशा दरमाही एका पेक्षा एक दमदार चित्रपटांतून आपले मनोरंजन करणारे आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावे आता लवकरच 'प्रेमला पिक्चर्सनिर्मित 'छंद प्रितीचाह्या येत्या १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटात आणखीन एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या नृत्यशैलीवर आधारित'छंद प्रितीचाहा आगामी सिनेमा लवकरचं आपल्या भेटीस येणार आहे. तमाशातील तन मन आणि धन ओतून वावरणार्‍या प्रत्येक मनस्वी कलाकाराच्या जीवनाचा वेध घेणारा हा चित्रपट... आजवर आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून विशेषत: चरित्रात्मक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे सुबोध भावे या चित्रपटातून 'राजारामनामक एका ढोलकी वादकाच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेत आढळून येणार आहेत.

संगीत आणि सुबोध यांचं अतूट नातं आपण ह्या आधी देखील 'कट्यार काळजात घुसलीया चित्रपटातून पाहिलं आहे. संगीताचा कोणताही प्रकार असोसुबोधची त्यातील वाखाणण्याजोगी असलेली जाणं आता आपणांस पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. निर्माते चंद्रकांत जाधव यांच्या 'प्रेमला पिक्चर्सनिर्मित 'छंद प्रितीचाचित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केले असून छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचे आहे तर संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलेले आहे.

तेव्हा छंद प्रितीचा जरूर पहा येत्या १० नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात...

Crompton Launches New Range of Decorative Wall Lights Providing a Perfect Blend of Uniqueness & Aesthetics

December 16, 2024, Mumbai – Crompton Greaves Consumer Electricals Limited, renowned for its dedication to quality and innovative...