BEST OFFERS

Wednesday, 21 September 2016

प्रेमसंकट- उत्कंटा वाढवणारी प्रेमकहाणी 14 ऑक्टोबर' ला प्रेक्षकांच्या भेटीला...



योग्य संधी मिळाली तर नवीन कलाकारही यशस्वी चित्रपट देऊ शकतात हे हल्लीच काही प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या यशाने सिद्ध केलंय. पण नवीन चेहऱ्यांना घेऊन चित्रपट करायचा म्हणजे रिस्क आलीआणि भले- भले निर्माते अशी रिस्क घेत नाही. पण एका धाडसी निर्मातीने चक्क पाच नवोदितांना आपल्या आगामी मराठी चित्रपटात संधी दिली आहे.
रेहा फिल्म प्रोडक्शन च्या निर्मात्या दिक्षा युवराज सुरवाडे ह्या अशाच प्रकारचा नवोदित कलाकारांना प्राधान्य देणारा नवीन मराठी चित्रपट घेऊन येताहेत ज्याचे नाव आहे 'प्रेमसंकट'ह्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलंय दत्ता मिरकुटे यांनी. त्यांनीच अरुण कुलकर्णी सोबत संवादही लिहिलेत. प्रेमसंकट मधील पाचही गाणीजी भरपूर लोकप्रियता मिळवताहेतसंगीतबद्ध केली आहेत संगीतकार विशाल वानखेडे यांनी व स्वरसाज चढवलायसाधना सरगमआनंद शिंदेआदर्श शिंदेअमीर शेखनिशा भगतप्रतिभा बागेल,ह्यांनी. 
प्रेमसंकटची कथा फिरते दोन मुले आणि तीन मुलींभोवती ज्यात प्रेमदोस्तीअपहरणसूडस्मृतीभंशवगैरे गोष्टींमुळे प्रत्येक प्रसंगानंतर उत्कंठा वाढत जाते ज्यामुळे प्रेक्षक खुर्चीला खिळून बसतील. राज आणि त्याचे मित्र ह्यांनी पूजाला एका कुप्रसिद्ध गुंडमनडोलापासून वाचवलेले असूनही शेवटी ती राजला ओळखायला नकार देते. खरतर राज पोलिसांची मदत घेऊन पूजाला संरक्षण देतो. पण एकदा तिच्यासाठी जेवण घेऊन जात असताना मनडोला त्याला पकडतो व बेदम मारहाण करतो व त्याचा आई-वडिलांना धमकी देतो. परंतु राज कोणालाही न जुमानता पूजाला एका फार्म हाऊसमद्धे लपवून ठेवतो. त्याच काळात त्यांचे एकमेकांवर प्रेम जडते. त्यांच्या प्रेमाची अखेर काय होतेपूजा राजला ओळखायला का नकार देतेमनडोला राज-पूजाला शोधून काढतो काइत्यादी गुंतागुंतीची उकल प्रेमसंकट चित्रात पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शकाने अधे-मधे विनोदाची पेरणी करत प्रसंग खुसखुशीत होतील ह्याची काळजी घेतली आहे.
ह्या चित्रपटातराज सुरवाडेमोनालिसा बागलराहुल भिसेअंकिता परमारदामिनी डोळसह्या नवीन कलाकारांसोबत मातब्बर कलाकारांचा फौलफाटादेखील आहेउदा. निशिगंधा वाडसतीश पुळेकरलतिका गोरे,यतीन कार्येकरराजेंद्र शिसातकर. ह्या चित्रपटाचे मनोहारी चित्रीकरण केलंय रवी भट यांनी व सहाय्यक दिग्दर्शक आहेत मोहम्मद शेख आणि नम्रता शाह.

Crompton Launches New Range of Decorative Wall Lights Providing a Perfect Blend of Uniqueness & Aesthetics

December 16, 2024, Mumbai – Crompton Greaves Consumer Electricals Limited, renowned for its dedication to quality and innovative...