हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी आता प्रथमच “१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी” या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच ह्या चित्रपटाचा मुहूर्त महाराष्ट्राचे वनमंत्री पतंगराव कदम ह्यांच्या हस्ते पुणे येथे पार पडला.
योगिराज एंटरटेन्मेंट निर्मित १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी ह्या चित्रपटाचे निर्माते लहु जाधव व शंकर मिटकरी असून माहेरची साडी सारख्या बर्याच प्रसिद्ध चित्रपटाचे जेष्ठ दिग्दर्शक पितांबर काळे, हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कथा पुरुषोत्तम बोरकर यांची असूनत्यातील पटकथा, संवाद व गीते अशी तिहेरी बाजू आबा गायकवाड यांनीसांभाळली आहे. यावेळी ओम पुरी म्हणाले, “मी मुंबईत गेली ४० वर्षे राहतो.महाराष्ट्राने मला नाव, पैसा दिला. महाराष्ट्राचा मी खूप आभारी आहे. मी स्वतःला मराठी समजतो.. आणि मला मराठी नाटक, चित्रपट व साहित्य आवडतं.” तसेच या चित्रपटात ओम पुरींसोबत मनोज जोशी, किशोरी शहाणे,दिपाली सय्यद, भाऊ कदम, प्रेमा किरण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.