BEST OFFERS

Friday 30 August 2019

जेसीबी इंडियातर्फे कोल्‍हापूर व सांगलीमधील पूरग्रस्‍त भागांमध्‍ये मशिन्‍स तैनात करत मदतकार्याला हातभार

Image result for JCB logo



मानवहितकारी प्रयत्‍नांना पाठिंबा देण्‍यासाठी नागरी अधिका-यांच्‍या सहयोगाने ११ जेसीबी मशिन्‍स तैनात
कोल्‍हापूर / सांगली, 29 ऑगस्‍ट 2029: जेसीबी इंडिया लिमिटेड या भारताच्‍या अर्थमूव्हिंग व बांधकाम उपकरणाच्‍या आघाडीच्‍या उत्‍पादक कंपनीने पुण्‍यातील त्‍यांचे डिलर सिद्धार्थ ऑटो इंजीनिअर्सच्‍या सहयोगाने महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर व सांगली जिल्‍ह्यांमधील पूरग्रस्‍त भागांमध्‍ये उपकरण व त्‍यांची टीम तैनात केली आहे. 
पुण्‍यातील त्‍यांचे डिलर सिद्धार्थ ऑटो इंजीनिअर्सच्‍या सहयोगाने ११ जेसीबी मशिन्‍स 22 ऑगस्ट पासून ते आज पर्यन्त प्रत्यक्ष काम करीत असून यापुठेही कोल्‍हापूर व सांगली जिल्‍ह्यांमधील पुरग्रस्त भागांमधील पुरचा कचरा स्वच्छ करण्यासाठी अजुन काही दिवस मदत करणार आहेत.
जेसीबी इंडिया लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विपीन सोंधी म्‍हणाले, ''नैसर्गिक आपत्‍तीचा परिणाम सोसावा लागणा-या समुदायांना पाठिंबा देण्‍याची कटिबद्धता कायम राखत जेसीबी इंडियाने कोल्‍हापूर व सांगलीच्‍या पूरग्रस्‍त भागांमध्‍ये पूराचा कचरा स्‍वच्‍छ करण्‍यासाठी आणि सुरू असलेल्‍या मदतकार्याला हातभार लावण्‍यासाठी ११ मशिन्‍स तैनात केल्‍या आहेत. आमच्‍या टीम्‍स या अवघड काळामध्‍ये स्‍थानिक प्रशासनाच्‍या सहयोगाने काम करत आहेत आणि पूरग्रस्‍त भागांची स्थिती पूर्वपदावर येण्‍याप्रती योगदान देत आहेत. या भागांमध्‍ये राहणा-या लोकांना गेल्‍या दोन आठवड्यांमध्‍ये अत्‍यंत हलाखीच्‍या स्थितीचा सामना करावा लागला आहे आणि त्‍यांनी अशा परिस्थितींमधून देखील पुढे जाण्‍याचा निर्धार केला आहे.''
जिल्‍ह्यांमध्‍ये पुन्‍हा पायाभूत सुविधा पूर्वपदावर आणण्‍याचे काम सुरू होण्‍यापूर्वी पूराचा कचरा स्‍वच्‍छ करणे महत्‍त्‍वाचे आहे. पूरग्रस्‍त भागांमध्‍ये अहोरात्र काम करत या जिल्‍ह्यांमधील स्‍थानिक प्रशासनांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. जेसीबी मशिन्‍स कच-याचे ढिगारे, गाळ आणि मृत पशु स्‍वच्‍छ करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाच्‍या मदतीने काम करत आहेत.
जिल्‍ह्यांतील लक्ष्‍मीपुरी, शाहूपुरी, शिरोळ तालुका, शिंगणापूर वॉटर पंपिंग स्‍टेशन, कोल्‍हापूर-रत्‍नागिरी महामार्ग आणि आरे गाव, तसेच सांगलीमधील टिंबर भाग – सांगली बायपास आणि मुख्‍य शहर क्षेत्र – ट्रक अड्डा या ठिकाणी जेसीबीने मशिन्‍स तैनात केल्‍या आहेत.
कंपनीने गेल्‍या वर्षी केरळला उध्‍वस्‍त केलेल्‍या पूरादरम्‍यान देखील मदतकार्यामध्‍ये हातभार लावला होता.
जेसीबी इंडिया बाबत:
जेसीबी इंडिया लिमिटेड ही भारतातील अर्थमूव्हिंग व बांधकाम उपकरणाची आघाडीची उत्‍पादक कंपनी आहे. १९७९ मध्‍ये कंपनी एक संयुक्‍त उद्यम म्‍हणून सुरू झाली आणि आता युनायटेड किंग्‍डममधील जे सी बॅम्‍फोर्ड एक्‍सेव्‍हेटर्सची पूर्णत: मालकीची उपकंपनी आहे. भारतात पाच अत्‍याधुनिक कारखाने असलेली कंपनी आज ८ उत्‍पादन केंद्रांमध्‍ये ६० हून अधिक उत्‍पादनांची निर्मिती करते. भारतात या उत्‍पादनांची विक्री होते, शिवाय ही उत्‍पादने १०० हून अधिक देशांना निर्यात केली जात आहेत. 
जेसीबीचे बांधकाम उपकरण उद्योगामध्‍ये सर्वात मोठे डिलर नेटवर्क आहे. तसेच भारतभरात ६० हून अधिक डिलर्स आणि ७०० आऊटलेट्स आहेत. जेसीबीने भारतातील दिल्‍ली-एनसीआर, पुणे आणि जयपूर येथील त्‍यांच्‍या कारखान्‍यांच्‍या आवारात असणा-या समुदायांना नेहमीच सक्रियपणे पाठिंबा दिला आहे. आज जेसीबी ५५ हून अधिक सरकारी शाळा आणि १० व्‍यावसायिक प्रशिक्षण केंद्रांना पाठिंबा देते. ज्‍याचा १५,५०० हून अधिक विद्यार्थी आणि स्‍थानिक तरूणांना लाभ होतो.

Svayam's 'Accessible Family Toilet Project' Reveals that 76% of People in Rural India, with Reduced Mobility, Struggle to Access Basic Sanitation Facilities

In four years, 1.44 crore individuals have been made aware of the significance of accessible sanitation across 14 st...