BEST OFFERS

Sunday, 4 October 2015

मुंबईच्या “चाळ संस्कृती” चे दर्शन “दगडाबाईची चाळ”


साधारणपणे ऐंशीच्या दशकापर्यंतगिरगावलालबागपरळ या मुंबईच्या गजबजलेल्या लोकवस्तीतील टोलेजंग चाळी आणि त्यात दाटीवाटीने राहणारा मध्यमवर्गीयनिम्न मध्यमवर्गीय मराठी माणूसत्याचे चाळकरी जनजीवन यांनी मुंबई शहराला एक वेगळी ओळख मिळवुन दिली होतीयाच मुंबईच्या चाळकरी लोकवस्तीचे दर्शन घडवणारा दगडाबाईची चाळ हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबर २०१५ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
"दगडाबाईची चाळ" चित्रपटाचा "म्युझिक लॉंच" सोहळा, 3 ऑक्टोबर २०१५ रोजीसर्व कलाकारांच्या उपस्थितीत,मुंबईत संपन्न झाला.
जय भोले फिल्म्स प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते आहेत दत्तात्रय भागुजी हिंगणेतर कथापटकथालेखनआणि दिग्दर्शन सुनील वाईकर यांनी केले आहे. चित्रपटासाठी संवाद लेखनअभिजित पेंढारकर यांनी केले आहे.
या चित्रपटातली दगडाबाईची चाळ ही मुंबईच्या परळ भागातील आहे आणि दगडाबाई” ही या चाळीची मालकीण आहेखरं तर चाळीतल्या सर्व खोल्यादगडाबाईने भाडेकरुनाभाडेतत्वा वर दिल्या आहेतपण दगडाबाईच्या प्रेमळदयाळू स्वभावाचा गैरफायदा घेऊनचाळीतील एकसे एक नमुनेदार भाडेकरूनीवर्षानुवर्षे खोलीच्या भाड्याचे पैसे थकवले आहेतत्यातच दगडाबाई एका कोर्टकेस च्या अडचणीत सापडली आहेती अडचण कशीबशी निस्तरते की नाही तोच दगडाबाईच्या दोन्ही भाच्या अचानक घरातून गायब झाल्या आहेत.या सगळ्या अडचणीतून दगडाबाई सुखरूप बाहेर पडते का आणि कशीतसेच चाळीतील  भाडेकरूंच्या उपजत स्वभाव वैशिष्ट्यांमुळे,  निर्माण होणारे विनोद या भोवती चित्रपटाची कथा फिरत राहते.
या चित्रपटासाठीगीते नचिकेत जोग यांनी लिहिली आहेत तर त्यांच्या गाण्यांना स्वरसाज चढवला आहे केदार पंडित आणि अजय-अद्वैत या त्रयींनीसध्याच्या तरुणाई मध्ये लोकप्रिय असणारे आवाज,  स्वप्नील बांदोडकरवैशाली सामंतयांनी गाण्यांना आपला आवाज दिला आहेतसेच आदर्श शिंदेयोगिता गोडबोलेप्रतिभा थोरातशलाका चांदवडकर या गायकांनीही,पार्श्वगायन केले आहेतर दिलिप मेस्त्री यांनी नृत्य दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.
चित्रपटातराजपाल यादवविशाखा सुभेदारसंग्राम साळवी, मोहिनी कुलकर्णी, भूषण कडू, श्वेता पगार, कमलाकर सातपुतेकिशोर चौगुलेमाधवी जुवेकरसुनील गोडबोलेजॉनी रावतप्रशांत तपस्वीसंतोष चोरडिया या कलाकारानी विविध भूमिका रंगवल्या आहेत.   
हिंदी चित्रपट सृष्टीतमालामाल विकलीभूतनाथफिर हेरा फेरी सारख्या असंख्य हिंदी चित्रपटांतून विनोदी अभिनयाने स्वतःचा ठसा  उमटवणारे राजपाल यादव यांनी या चित्रपटात रंगवलेला जिलेबीवाला प्रेक्षकांसाठी नक्कीचखास आकर्षण ठरेल.

PM to visit Maharashtra on 5th October

Prime Minister's Office azadi ka amrit mahotsavg20-india-2023 PM to visit Maharashtra on 5th October PM to launch various initiatives re...