(लेखक: श्री. प्रभाकर तिवारी, सीएमओ, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)
काही वर्षांपूर्वी जगाला डिजिटल सोल्यूशन्सचा शोध लागला आणि कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी घरात राहवे लागण्याच्या काळात तर या उपाययोजनांची अखंड भरभराट झाली. प्रत्येक क्षेत्र डिजिटल भांडवलाच्या शोधात असताना बिझनेसदेखील ग्राहकांना, सेवा प्रदात्यांना ऑनलाइन सेवा देण्यासाठी हे तंत्रज्ञान स्वीकारत आहेत. यातच पैसा कमावण्याचे आणखी काही मार्ग खुले झाले आहेत, ज्याद्वारे किफायतशीर मार्केटिंग सोल्युशन्स समोर आणले आहेत.
अनेक तंत्रज्ञान क्रांतीनंतर, मार्केटिंग व जाहिरात क्षेत्राला या बदलांपासून वेगळे राहणे कठीण आहे. कारण या प्रवाहात यूझर्सचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. तसेच भारतात इंटरनेट व स्मार्टफोन वापरातील विस्फोट हा दैनंदिन जीवनात डिजिटल इकॉनॉमीने किती बदल घडवले आहेत, हे दिसते. त्यामुळे ब्रँड व जाहिरातदारांना मार्टेक आधारीत चॅनल्सचा आधार घेण्याचे मूल्य कळाले असून याद्वारे त्यांच्या उत्पादनविक्रीत वृद्धी कायम राहू शकते.
विविध धोरणांमध्ये मार्टेकची भूमिका: एखाद्या प्लॅनमध्ये जेव्हा विविध दृष्टीकोनांद्वारे सर्व शक्य चॅनल्सचा विचार केला जातो, तेव्हाच ते अचूक मार्केटिग धोरण असू शकते. पायाभूत बाबी समान राहतील. डिजिटल साधने एकत्रितपणे मार्टेक सोल्यूशनची स्थापना करतात. ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, सर्व क्षेत्राच्या गरजांशी जुळते सर्व प्रवाहांची यादी करण्यापासून या सर्वाची सुरुवात होते. प्रत्येक गरज लक्षात घेऊन ती भागवण्यासाठी योग्य प्रभावी साधन वापरणे, ही त्यामागील कल्पना आहे. स्टॅकमध्ये इमेल मार्केटिंग, सर्वाधिक वेळ गुंतवून ठेवणारे सोशल मीडिया सॉफ्टवेअर्स, मोबाइल आधारीत साधने व अॅप्स, सीआरएम सॉफ्टवेअर्स , एसईओ टूल्स, डाटा अॅनलेटिक्स साधने इत्यादी घटकांचा समावेश असू शकतो. हे घटक यूझरची मूल्यांकन व रेकॉर्ड करण्याची पातळी वाढवते. तसेच ग्राहकांच्या पसंतीबाबत अधिक माहितीदेखील पुरवते.
जेथे एखाद्या मोहिमेचे सलग टप्प्या-टप्प्याने नियोजन करणे आवश्यक असताना, डाटा अॅनलाइज ही गरज बनली आहे. अशा स्थितीत तंत्रज्ञान हे निर्णय घेणाऱ्याची नव्हे तर सक्षमकाची भूमिका बजावू शकते, हे लक्षात ठेवावे. एकूणच, डेटा कशा प्रकारे वापरला पाहिजे, कोणत्या साधनांमध्ये गुंतवणूक हवी, प्रेक्षकांसाठी कोणत्या वेगळ्या प्रकारे मार्केटिंग कँपेन केले पाहिजेत याची संपूर्ण जबाबदारी ग्राहक व मार्केटिंग एजन्सीवर असते. प्रत्येक फर्मला विविध साधनांचा सेट किंवा मार्टेक स्टॅकची गरज असू शकते. संबंधित क्षेत्र किंवा दिल्या जाणाऱ्या सेवेवर ते आधारीत आहे.
प्रचंड डिजिटल वृद्धी दर्शवणारे क्षेत्र: कोव्हिड-१९ साथीमुळे प्रत्येक क्षेत्रातील विक्री व आकडेवारीवर परिणाम झाला. ब्युटी आणि वेलनेसचे उदाहऱण घेऊ. कोरोना विषाणूचा उद्रेक होईपर्यंत उत्साही लोकांकडून याचा सोयीनुसार वापर केला जात होता. ई-कॉमर्सच्या गगनाला भिडणाऱ्या शुल्कामुळे तसेच यशस्वी लॉकडाऊनमुळे या कंपन्यांना दारोदार डिलिव्हरी आणि ऑनलाइन सेवा प्रदान कराव्या लागल्या. यातून वेगळे मार्टेक सोल्युशनची मागणी आली. कारण इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर तरुण डेमोग्राफिकची गरज होती. हे लोक ब्रँड काँशियस व समाजातील विशिष्ट स्तराशी निगडित आहेत. या कंपन्यांना डिजिटल मार्केटिंग अॅव्हेन्यू वापरावे लागतील. यात मार्केटप्लेस/नेटवर्कस इन्फ्लूएंसर प्लॅटफॉर्म्स, सोशल मीडिया मेसेंजर्स, ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या जाहिरातींचा समावेश होतो. याद्वारे कंपन्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचतील.
याचप्रमाणे, वित्तीय सेवा क्षेत्रात तरुण व्यावसायिक, लघु व मध्यम उद्योग, नवे कर्जाचे ग्राहक इत्यादींना दिल्या जातात. या प्रकारची डेमोग्राफिक मोठ्या भागात विस्तारलेली असल्याने इंटरनेटचा वापर वाढल्यास अधिकाधिक लोक वित्तीय क्षेत्राशी जोडले जातात.
या स्थितीतदेखील, मार्केटर्सना बीएफएसआय सेक्टरसाठी मार्टेक सोल्युशन तयार करताना आणखी एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. ती म्हणजे त्यांची पोहोच खूप विस्तृत आहे. संपूर्ण इकोसिस्टिम ही विकसित होणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या गतीशील स्वरुपाचे निदर्शक आहे. व्यवसाय व संस्थांनी प्रत्येकाकडे उपलब्ध असताना हजारो मार्टेक साधने वापरण्यापूर्वी विशिष्ट क्षेत्रातील अजेंड्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपले लक्ष्य मोठ्या प्रमाणावर नेतृत्व करण्यावर आहे की, वैयक्तिकृत उद्देशावर आहे, हे ठरवणे आवश्यक आहे. साधनांचा प्रभावीपणे वापर केल्यास व्यवसायांना फरक नक्की जाणवेल.