भारताचे पहिले बी2बी ऑनलाईन ज्वेलरी एक्झिबिशन
मुंबई, 30 जुलै, 2020: भारतात इंफोर्मा मार्केट्स (पूर्वीची युबीएम इंडिया), ही भारताची अग्रगण्य बी2बी एक्झिबिशन ऑर्गनायझर असून तिने बी2बी ऑनलाइन कम्युनिटी ज्वेलरी नेट सोबत व्यावसायिक खरेदीदार तसेच विक्रेता यांना एकत्र घेऊन ज्वेलरी ग्रुप ऑफ इंफॉर्मा मार्केट्स प्रस्तुत सर्वसमावेशक डिजीटल मंचासह नवीन स्वरुपाच्या ‘ज्वेलरी अँड जेम व्हर्च्युअल एक्झिबिशन’ची 19-20 ऑगस्ट 2020 रोजी आयोजनाविषयी घोषणा केली आहे.
सध्या करोना महासाथीचे सावट असल्याने सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून प्रवासावर निर्बंध असून समाजात वावरताना शारीरिक अंतर राखावे लागते आहे. या स्थितीमुळे प्रदर्शन उद्योगावर मोठा परिणाम झाला असून कुठेही वास्तविक प्रदर्शन भरवले जात नाही. तरीच काळाची गरज ओळखून आभूषण आणि खडे/रत्न उद्योगात नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘ज्वेलरी अँड जेम व्हर्च्युअल एक्झिबिशन’चे काळजीपूर्वक आरेखन करण्यात आले. यामुळे व्यावसायिकांना सध्याच्या कठीण काळात आपला व्यवसाय स्थिर करण्याची संधी मिळेल. त्याचप्रमाणे आवश्यक ते उपाय उपलब्ध होणार आहेत.
द बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, मालिवारा ज्वेलर्स असोसिएशन, दिल्ली, मीरत बुलियन ट्रेडर्स असोसिएशन, हायटेक सिटी ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि ज्वेलरी अँड मशिनरी असोसिएशनच्या साह्याने ‘ज्वेलरी अँड जेम व्हर्च्युअल एक्झिबिशन’द्वारे लोकप्रिय ब्रँड, सल्लागार, व्यवसाय तज्ज्ञ आणि प्रमुख सरकारी अधिका-यांच्या सोबतीने रत्न आणि आभूषण उद्योगाशी निगडीत घटकांना समान व्हर्च्युअल मंचावर एकत्र आणणार आहे. यावेळी सहभाग दर्शवणाऱ्यांमध्ये ज्वेलरी होलसेलर्स, रिटेलर, इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर्स असतील. तसेच ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर, डायमंड, जेमस्टोन, पर्ल सप्लायर आणि ट्रेडर्स, मौल्यवान धातू आणि दागिने घडवणारे व्यापारी तसेच पुरवठादार व व्यापार आणि सरकारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. हे सर्व घटक एकाच छताखाली एकत्र येतील, एकमेकांशी जोडले जातील, त्यांचे संपर्कजाळे तयार होईल आणि व्यवसाय वाढीला लागेल.
या व्हर्च्युअल शोमध्ये भारतातील राज्ये, जसे की महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पश्चिम बंगाल सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनाला व्हर्च्युअल स्रोत, व्यवसायाचे आयोजन करण्यासाठी, ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी; त्याचप्रमाणे वैश्विक बाजारातील ट्रेंड्स जाणून घेण्यासाठी अद्वितीय मंच आवश्यक होता. जेणेकरून सध्याच्या कठीण काळात प्रोत्साहन मिळेल. सोबतच सोने, हिरे, चांदी, खडे-रत्न, यंत्र आणि तत्सम घटकांना वाहिलेले पव्हिलियन या प्रदर्शनात उपलब्ध असतील. जे अनेक जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांनी जसे की डिझायनर गॅलेरी, 50,000 हून अधिक डिझाईननी सजलेले असतील, त्यात खरेदीदार-विक्रेते व्हिडियो मीट, डिजीटल शोरूम, प्रोडक्ट लॉन्च, माहितीपूर्ण मालिकांचा समावेश राहील. मुख्य उत्सवापूर्वी व्हर्च्युअल एक्स्पोची धोरणात्मक आखणी करण्यात आली आहे. लवकरच लग्नसराईला सुरुवात होत असल्याने खरेदीच्या दृष्टीने ही वेळ योग्य ठरेल.
‘ज्वेलरी अँड जेम व्हर्च्युअल एक्झिबिशन’ची ही पहिलीच वेळ असल्याने त्याविषयी बोलताना भारतातील इंफोर्मा मार्केट्सचे व्यवस्थापक संचालक योगेश मुद्रास म्हणाले की, “उद्योग क्षेत्रातील खडे आणि आभूषण परिघातील पहिलाच व्हर्च्युअल प्रयत्न करत असल्याने आम्ही अतिशय उत्सुक आहोत. हा कार्यक्रम अग्रगण्य-अत्याधुनिक वेब आधारीत मंच उपलब्ध करून देणार असून त्यात उच्च गुणवत्तापूर्ण, ज्वेलरी प्रकार, अंदाज, बाजाराचे ट्रेंड आणि नेटवर्किंग संधींची खातरजमा करतील. हे सर्व बोटाच्या एका अग्रभागावर शक्य होणार आहे. टाळेबंदीत शिथिलता आणण्याच्या पहिल्या टप्प्यात रत्न आणि दागिने उद्योग पुन्हा हळूहळू रुळावर येऊ लागला आहे. ग्राहकांच्या वागणुकीत मोठा बदल जाणवतो आहे. आता नव्याने परिस्थितीशी एकरूप होण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार दागिने विक्रेता समुदायाला परिवर्तन आणावे लागेल. सध्या बाजारपेठेत आलेल्या बदलासोबत जुळवून घेण्याचा ज्वेलरी अँड जेम व्हर्च्युअल एक्झिबिशन प्रयत्न असणार आहे. सध्याच्या विपरीत परिस्थितीत व्यापारासाठी संघटीत रचना तयार करणे, आपल्या खरेदीदार समुदायाकरिता असमांतर मानक स्थापनेचा मानस आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आत्मविश्वास, वैविध्य, अस्सलता आणि पारदर्शकता निर्माण करायची आहे.”
रत्न आणि आभूषण क्षेत्र हे एक श्रेष्ठ क्षेत्र असल्याचा स्वीकार भारत सरकारने केला असून भारताची निर्मिती क्षमता सुधारून गुंतवणूकदारांना हात देण्याचा प्रयत्न आहे. कोविड-19 या एकमेव घटकामुळे आभूषण मागणी कमी झाली, त्यावर विपरीत परिणाम झाला. अलीकडच्या वर्ल्ड गोल्ड कौन्सिल रिपोर्ट अनुसार 2020 च्या पहिल्या तिमाहीत वैश्विक दागिन्यांना मोठा फटका बसला, त्यात 39% ची घट आली. भारतासाठी अकरा वर्षांतील 41% घसरण पाहायला मिळाली. तर 2020 च्या 1 ल्या तिमाहीत सोन्याचा भाव मात्र आकाशाला भिडणारा राहिला. त्यात ऐतिहासिक वृद्धी नोंदवली गेली. 1.0 अनलॉक सुरू झाल्यापासून रत्न आणि आभूषण क्षेत्र टप्प्याटप्प्याने सर्वसामान्य होऊ लागले असताना त्यात विक्रीमध्ये 20-25% वसुली पाहायला मिळाली. तरी अजूनही अनिश्चिततेचे सावट आहे, भारतीय लोक सोन्याकडे भावनिक आणि व्यावहारिक दृष्टीने पाहतात. कारण ही एक सुरक्षित गुंतवणूक ठरते. सोन्याकडे केवळ एक शोभिवंत गोष्ट म्हणून पाहिले जात नाही तर ते सुरक्षेचे चिन्ह ठरते.
या व्हर्च्युअल एक्स्पोमध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असलेले द्रष्टे सेमिनार होणार आहेत, ज्यामध्ये रत्न आणि आभूषण उद्योग क्षेत्र : ‘न्यू नॉर्मल;चा स्वीकार करताना, सोने : 2020-21 मधील धोरणात्मक मालमत्ता, सरकारी आदेश आणि हॉलमार्कींगचे उद्योगसंबंधी फायदे इत्यादीवर चर्चा होईल. यावेळी होणाऱ्या परिसंवादात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, जीआयए, देशामधील सर्वोच्च दागिने समितींशी संलग्न काही प्रमुख मान्यवरांची उपस्थिती रोमांचक ठरेल.
यंदाच्या प्रदर्शनकर्त्यांच्या यादीत व्हीके ज्वेल्स, एसएमआर, तन्वी गोल्ड कास्ट, स्वर्णशिल्प, जेकेएस अशा नावांचा समावेश आहे. भारतात इंफोर्मा मार्केट्सच्या वतीने ज्वेलरी पोर्टफोलियोची सुरुवात करताना एचजेएफ आणि डीजेजीएफच्या यशस्वी वेबिनार मालिकांचा समावेश असून त्यात समस्या व्यवस्थापन, अस्तित्व राखणे आणि पुनरुज्जीवन धोरणासह परिणाम दाहकता कमी करणे तसेच उत्तर भारतातील रत्न आणि आभूषण उद्योग क्षेत्र : आव्हानांपासून उपायांच्या दिशेने मार्गक्रमणा आदी विषयांची चर्चा होईल.
About Informa Markets
Informa Markets creates platforms for industries and specialist markets to trade, innovate and grow. Our portfolio is comprised of more than 550 international B2B events and brands in markets including Healthcare & Pharmaceuticals, Infrastructure, Construction & Real Estate, Fashion & Apparel, Hospitality, Food & Beverage, and Health & Nutrition, among others. We provide customers and partners around the globe with opportunities to engage, experience and do business through face-to-face exhibitions, specialist digital content and actionable data solutions. As the world’s leading exhibitions organiser, we bring a diverse range of specialist markets to life, unlocking opportunities and helping them to thrive 365 days of the year. For more information, please visit www.informamarkets.com
About Informa Markets and our business in India
Informa Markets is owned by Informa PLC, a leading B2B information services group and the largest B2B Events organiser in the world. Informa Markets in India (formerly UBM India) is India's leading exhibition organizer, dedicated to help specialist markets and customer communities, domestically and around the world to trade, innovate and grow through exhibitions, digital content & services, and conferences & seminars. Every year, we hosts over 25 large scale exhibitions, 40 conferences, along with industry awards and trainings across the country; thereby enabling trade across multiple industry verticals. In India, Informa Markets has offices across Mumbai, New Delhi, Bangalore and Chennai. For further details, please visit – https://www.informamarkets.com/en/regions/asia/India.html